बोपदेव घाटात तरुणीवर चाकूने वार करत लूटले

२९ वर्षीय तरूण व त्याची मैत्रीण सोमवारी बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. बोपदेव घाटात फिरून झाल्यानंतर ते परत येत होते. तरुणी व ते खाली उतरत असताना तरुणी लघुशंका करण्यास थांबली.

    पुणे : मित्रासोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमी युगलावर चोरट्यांनी डाका घातला आहे. तरुणी लघुशंका करण्यास गेल्यानंतर तीन चोरट्यांनी तिच्यावर चाकूने वार केले आणि तिच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली आहे.
    याप्रकरणी  २९ वर्षीय तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १६ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला आहे.
    पोलिसांच्या माहितीनुसार, २९ वर्षीय तरूण व त्याची मैत्रीण सोमवारी बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. बोपदेव घाटात फिरून झाल्यानंतर ते परत येत होते. तरुणी व ते खाली उतरत असताना तरुणी लघुशंका करण्यास थांबली. यावेळी आलेल्या तीन चोरट्यांनी तिच्यावर चाकूने वार केले. तसेच तिच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोन साखळी हिसकावली. तरुणी यामुळे घाबरून गेली होती. त्यानंतर आरिफकडे मोर्चा वळत या चोरट्यांनी त्याच्याकडे असलेली १ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.