पुण्यात अमली पदार्थाची विक्री करणासाठी आलेल्या परराज्यातील तरुणाला अटक

गांजा, चरस तसेच एमडी या अमली पदार्थांची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून त्यावर नजर ठेवून कारवाई केली जात आहे. यादरम्यान पथक खडकी परिसरात गस्त घालत होते. यावेळी खडकी बाजार येथील बस स्टँड समोर एकजण संशयास्पदरीत्या दिसून आला.

    पुणे :  परराज्यातून अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी पुण्यात आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून १० लाख १० हजार रुपयांचे १ किलो चरस जप्त केले आहे.
    विकास बब्बरसिंह इटकान (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गांजा, चरस तसेच एमडी या अमली पदार्थांची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून त्यावर नजर ठेवून कारवाई केली जात आहे. यादरम्यान पथक खडकी परिसरात गस्त घालत होते. यावेळी खडकी बाजार येथील बस स्टँड समोर एकजण संशयास्पदरीत्या दिसून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगची तपासणी केली. त्यात 1 किलो चरस हा अमली पदार्थ पोलिसांना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
    विकास मूळचा हरियाणातील हिस्सार येथील आहे. तो पुण्यात अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला होता. त्याच्याविरोधात एनडीपीएस एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.