अवसरी खुर्द येथे तरुणाची आत्महत्या

मंचर : अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे परप्रांतीय तरुण अजयकुमार राजनारायण राय (वय २१) याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. अवसरी खुर्द गावातील

मंचर : अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे परप्रांतीय तरुण अजयकुमार राजनारायण राय (वय २१) याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही. अवसरी खुर्द गावातील कौलीमळा येथे अजयकुमार राजनारायण राय (मूळ गाव संझाघाट ग्राराईल पुर्णिया, बिहार) हा राहत होता. अजय याने  लोखंडी अँगलला गळफास घेतला. याबाबत पुढील तपास मंचरचे पोलीस जवान हरिभाऊ नलावडे करीत आहेत.