पीएमपीएमएल बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

पुणे : भरधाव जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. विशाल राजेंद्र मोरे (वय २८) असे अपघातात मृत्यू

पुणे : भरधाव जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. विशाल राजेंद्र मोरे (वय २८) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीएमएलचा चालक मोतीलाल दत्तात्रय बागल (वय ४४, रा. बागल चाळ, फुगेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र बापूसाहेब पाटील (वय ४२, रा. मु.पो. मुधाळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी पाटील यांचा भाचा आपल्या दुचाकीवरून चालला होता. तो निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथे आला असता पीएमपीएमएलच्या बसने मोरे याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन मोरे यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.