
तिखटाचा सण पडला फिकाकिंक्रांतीला चिकन विक्रीवर ‘या’ कारणामुळे झाला परिणाम, मटण खरेदीसाठी मात्र मोठी रांग
महाड : आज महाड(mahad) तालुक्यात किंक्रांतीचा(kinkrant) सण साजरा करण्यात आला. तिखटाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंक्रांतीच्या सणाला नागरिकांनी चिकन(chicken sale down) ऐवजी मटणाला पसंती दिल्याने चिकन विक्री करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. बर्ड फ्लूच्या(bird flu) भितीपोटी खवय्यांनी चिकन खाण्याचे टाळले आहे. महाराष्ट्राच्या काही भागात कोंबड्या आणि अन्य पक्ष्यांना बर्ड फ्ल्यु या आजाराची लागण झाली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
