म्हसळ्यात नविन १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण आकडा २०

-ग्रामिण भागात फोफावतोय कोरोना म्हसळा :लॉकडाऊनच्या काळात म्हसळा तालुक्यातील ग्रामिण भागात असंख्य मुंबईकरांनी गावेच्या गावे भरली असून क्वारंटाइन केल्यानंतर काळजीपूर्वक एका खोलीत न रहाता

-ग्रामिण भागात फोफावतोय कोरोना

म्हसळा : लॉकडाऊनच्या काळात म्हसळा तालुक्यातील ग्रामिण भागात असंख्य मुंबईकरांनी गावेच्या गावे भरली असून क्वारंटाइन केल्यानंतर काळजीपूर्वक एका खोलीत न रहाता एकमेकांच्या संपर्कात आल्याने मोजक्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात इतर लोक आल्याने ग्रामिण भागात कोरोना फोफावत असल्याचे शनिवार, दिनांक ३० मे च्या म्हसळा तालुक्याच्या आकडेवारीवरून समजते. २९ मे पर्यंत तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १० होती मात्र पुढील २४ तासांत आणखी १० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २० वर पोहचली असून नजीकच्या काळात हा आकडा गुणाकार पद्धतीने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान दिनांक ३० मे २०२० अखेर नव्याने सापडलेल्या रुग्णांत ठाकरोली येथे एक मुलगी (वय-९ वर्षे), एक महिला (वय-२९ वर्षे), गायरोणे गावातील एक पुरुष (वय-३९ वर्षे), वारळ येथे एक मुलगी (वय-५ वर्षे), पुरुष (वय-३६ वर्षे),पुरुष (वय-२५ वर्षे),पुरुष (वय-६० वर्षे),एक मुलगी (वय-९ वर्षे), खरसई एक महिला (वय-७५ वर्षे), पाभरे एक मुलगा (वय-११ वर्षे) असे रुग्ण सापडले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी सांगितले आहे. वाढत्या रुगणांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी स्वतः ची काळजी स्वतः घेऊन कोरोनाला लवकरात लवकर हद्दपार करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन म्हसळा पंचायत समितीच्या सभापती उज्वला सावंत यांनी केले आहे.