रायगड जिल्ह्यात आज १०२ नवीन कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १०२ नवीन रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ७९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५३ पनवेल ग्रामीणमध्ये २० , कर्जत २० , उरण ३,

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १०२ नवीन रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ७९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५३ पनवेल ग्रामीणमध्ये २० , कर्जत २० , उरण ३, पेण २,  महाड २ आणि माणगावमध्ये १ नवीन रुग्ण सापडला  आहे . रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २५२०  झाली असून जिल्ह्यात १०१ जणांचा मृत्यू झाला आहे.               

रायगड जिल्ह्यात आज  कोरोनाचे १०२  नवीन रुग्ण सापडले असून ७९  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ७३  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ५३  नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात तळोजा पेंधर आणि पनवेल कोळीवाड्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे . कर्जतमधील एका व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये २०, कर्जत २०, उरण ३, पेण २, महाड २ आणि माणगावमध्ये १ नवीन रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात सोमवारपर्यंत ६८४० टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २५२० पॉझिटिव्ह आल्या आहेत. १२४  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १६६१ जणांनी मात केली असून ७५८८  रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.