नेरे गावातील हळद आणि लग्न महागात, नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू, १२ जण पाॅझिटिव्ह

पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे गावात शासनाचे नियम न पाळता हळदी समारंभ आणि लग्न करणे नवरदेवाला चांगलेच भारी पडले आहे. मोठ्या प्रमाणात जमवलेल्या गर्दीमुळे नवरदेवाच्या

पनवेल  : पनवेल तालुक्यातील  नेरे गावात  शासनाचे नियम न पाळता  हळदी समारंभ आणि लग्न करणे नवरदेवाला चांगलेच भारी पडले आहे.  मोठ्या प्रमाणात जमवलेल्या गर्दीमुळे नवरदेवाच्या भावाचा कोरोना संसर्ग होवून मृत्यू झाला आहे. तर गावातील इतर १२ जण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गावावर कोरोनाची दहशत असून गाव लाॅकडाऊन करण्यात आले आहे.

नेरे गावातील वामन पाटील यांनी मुलाचा लग्न समारंभ आयोजित केला होता. नवरदेव जितेश पाटील याने लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा मोठा बेत ठेवला होता. हळदीला थोडे थोडके नाही तर चक्क ४०० ते ५०० जणांनी हजेरी लावली होती. सर्वांसाठी खेकडे, मासे, मटनाची मेजवानी होती. राज्य सरकार एकीकडे गर्दी जमवू नका असे सांगत असताना दुसरीकडे सर्व नियम पायदळी तुडवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला गेला. दुसऱ्या दिवशी लग्न समारंभाला ही  मोठी गर्दी  होती.  लग्नासाठी ५० लोकांना परवानगी असतानाही जास्त लोक आले होते. विशेष म्हणजे एवढे सर्व होत असताना स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे 

कोरोना संसर्ग झाल्यामुळे नवरदेवाचा भाऊ जितेंद्र याचा कोरोनामुळं मृत्यू झाला. तर गावातील इतर १२ जण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गाव लाॅकडाऊन करण्यात आले आहे. हळदी समारंभ आणि लग्न समारंभाला गर्दी केल्या प्रकरणी नवरदेव , वडील आणि मुलीचे वडील असे तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.