रायगड जिल्ह्यात १२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १२८ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ७३ पनवेल

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज १२८  नवीन रुग्ण सापडले असून  दोघांचा  मृत्यू झाला आहे. तर  ५६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ७३ पनवेल ग्रामीणमध्ये १६, अलिबाग १२, पोलादपूर ८ ,उरण ५  , कर्जत ७, महाड ५ आणि पेणमध्ये २  रुग्ण सापडले  आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा  मृत्यू झाला आहे .रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या २२९६ झाली असून जिल्ह्यात ९६  जणांचा मृत्यू झाला आहे.                

रायगड जिल्ह्यात शनिवारी  कोरोनाचे १२८  नवीन रुग्ण सापडले असून १५५१ जणांनी अद्याप कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ८९  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ७३  नवीन रुग्ण सापडले आहेत. कळंबोली खिडुक पाडा प्लॉट नंबर १५४६ येथील २५ वर्षीय व्यक्तीचा आणि नावडे येथील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे.

पनवेल ग्रामीण मध्ये १६ , अलिबाग १२ , पोलादपूर ८ , कर्जत ७, उरण ५ , महाड ५ आणि पेणला २ नवीन रुग्ण सापडले  आहेत . रायगड जिल्ह्यात शनिवारपर्यंत ६३८२   टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २२९६ पॉझिटिव्ह आल्या आहेत.१९  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर.१५५१ जणांनी मात केली असून ६४९  रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ९६  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.