corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज १७५ नवीन कोरोना(corona ) रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर २८१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५२०४८ झाली असून जिल्ह्यात १४६८  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे १७५  नवीन रुग्ण सापडले असून २८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १३३ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १०८ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात एका  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये २५ , अलिबाग ११ , पेण ८ , उरण ८  ,रोहा ६ , खालापूर ५ ,  कर्जत ३ , आणि महाडमध्ये एक  रुग्ण  आढळला आहे. रायगड जिल्ह्यात १,८७,७६३ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ५२०४८ पॉझिटिव्ह आल्या आहेत १८८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४८२६०  जणांनी मात केली असून २३२० रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १४६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.