corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज २२७ नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज २२७ नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५१८७३  झाली असून जिल्ह्यात १४६७  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २२७ नवीन रुग्ण सापडले असून ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे .पनवेल तालुक्यात १७५  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १३३ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ३ आणि उरण येथील २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ४२ , अलिबाग १५ , खालापूर १२ , रोहा ८ , पेण ६ ,उरण ६ , महाड २ , माणगाव,  कर्जत  आणि पोलादापूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात १,८६,९२२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ५१,८७३  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच १८८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४७,९७९ जणांनी मात केली असून २४२७  रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १४६७  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.