Corona Virus

पनवेल : रायगड जिल्ह्यात (raigad district)आज २३० नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ५१४१५  झाली असून जिल्ह्यात १४५५  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २३० नवीन रुग्ण सापडले असून ३७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १७८ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १४० नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २ ,खालापूर २ , कर्जत २ आणि अलिबाग   येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीण मध्ये  ३८ , रोहा ११ , अलिबाग ८ , उरण ८ , खालापूर ६, पेण ४ , मुरुड ४   माणगाव ४  ,  कर्जत ३ ,  महाड २ , म्हसळा  आणि पोलादापूरमध्ये एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात १,८४,४१८ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ५१,४१५ पॉझिटिव्ह आल्या आहेत.तसेच १९८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४७,३२९ जणांनी मात केली असून २६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १४५५  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.