२४ तास शिक्षण सेवा, आमच्या गावात फक्त गुणवत्तेचीच हवा !

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरेखिंड शाळेतील उपक्रमशील शिक्षक विठोबा महादेव रेणोसे यांनी आपल्या शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑफलाइन पद्दतीने शिक्षण देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे '२४ तास शिक्षण सेवा, आमच्या गावात फक्त गुणवत्तेचीच हवा ! या उपक्रमाद्वारे त्यांनी संपूर्ण गावातील प्रत्येक घरांमध्ये दर्शनी भागातील भिंतीचा वापर करुन त्यावर शैक्षणिक साहित्याचे डीजीटल फ्लेक्स तयार करुन भिंतींवर लावले आहेत.

पोलादपूर: गेले सहा महिने संपूर्ण जगाला कोरोना या महामारीने ग्रासले असल्याने संपूर्ण भारतातील शिक्षणव्यवस्था बंद असून कधी चालू होतील हे निश्चित सांगता येत नाही. शासनाने सध्या ऑनलाइन शिक्षण चालू केले आहे.परंतु अनेक गावे खेड्यापाड्यांत असल्याने सर्वच ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देण-घेण शक्य होत नाही. तर खेड्यात बर्यागचवेळा सतत वीज नसते. तसेच पालक गरीब असल्याने त्यांच्याकडे स्मार्टफोन नसतो. खेड्यात बहुतांश वेळेस नेटवर्क नसते.त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण शक्य होत नाही. खेड्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी शिक्षक व शासन अनेक मार्गाने शिक्षण देण्याचे काम करत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल पोलादपूर तालुक्यातील चिरेखिंड गाव चोहोबाजूंनी घनदाट जंगल दिवसाही जंगली हिंश्र प्राण्यांचा वावर डोंगराळ व दुर्गम परिसर या परिसरांत शिक्षणाचे पविञ काम शिक्षक करतोय.

सुरुवातीला  २००१ साली गुरांच्या गोठ्यात चिरखिंड वस्तीशाळा सुरु केलेली व आज उच्च प्राथमिक शाळा झाली त्यामुळे गुणवत्तेत ही शाळा अ श्रेणीत आहे. रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरेखिंड शाळेतील उपक्रमशील शिक्षक विठोबा महादेव रेणोसे यांनी आपल्या शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑफलाइन  पद्दतीने शिक्षण देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे ‘२४ तास शिक्षण सेवा, आमच्या गावात फक्त गुणवत्तेचीच हवा ! या उपक्रमाद्वारे त्यांनी संपूर्ण गावातील प्रत्येक घरांमध्ये दर्शनी भागातील भिंतीचा वापर करुन त्यावर शैक्षणिक साहित्याचे डीजीटल फ्लेक्स तयार करुन भिंतींवर लावले आहेत. हे करत असतांना त्यांनी मराठी, इंग्रजी, गणित ,विज्ञान , समाजशास्ञ इत्यादी सर्वच विषयांतील महत्वाचे असे शैक्षणिक फ्लेक्स तयार करुन विद्यार्थी असलेल्या प्रत्येक घरात लावलेले आहेत.     

गावातील शिकलेल्या मुलांचा या उपक्रमात सहभाग घेवून त्यांच्याद्वारे सदर उपक्रमाचे नियमितपणे नियंञण केले जात आहे.तसेच शाळेतील अन्य हुशार विद्यार्थ्यांमार्फत मागोवा घेतला जात आहेत.आज घरा-घरांत मुले शिक्षण घेत आहेत. तसेच स्वाध्याय पुस्तिका सोडवूनही अभ्यास घेतला जातो आहे. हा उपक्रम २४ तास सर्वांसाठी खुला असल्याने मुलांना आवडेल तेव्हा ,आवडीच्या विषयाचे,शिक्षण घेता येत आहे.तसेच गावातील सहा वर्षे वयाच्या आतीलही मुलं शिकतांना पहायला मिळत आहेत.हा आनंद पालक स्वत: डोळ्यांनी पाहतायेत.सर्वांची घरं कशी रंगीबेरंगी दिसत आहेत.सर्व गाव पुस्तकांचे गाव भिलार  सारखं वाटत आहे.गावात शिक्षणाचं वातावरण निर्मान झालय.       

गेले दोन महिने हा उपक्रम गावात चालू आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी नुकतेच शिक्षणप्रेमी  लक्ष्मण मोरे व  जितेंद्र शिंदे यांनी प्रत्यक्ष गावात जावून पाहणी केली व मुलांशी तसेच  ग्रामस्थांशी संवाद साधला . सदर उपक्रमाचे त्यांनी तोंड भरुन कौतुक केले आणि असे उपक्रम संपूर्ण महाराट्रभर व्हावेत अशी ईच्छा व्यक्त केली.त्यावेळी शाळेचे मुख्या जाधव सर, उपशिक्षक इंगवले सर, डगले सर शा. व्य. समिती अध्यक्ष  सचिन ढवळे हे उपस्थित होते. सदरचा उपक्रम यशस्वीपने राबविण्यासाठी  जितेंद्र शिंदे साहेब  (उद्योजक मुंबई ) यांनी उपक्रमाचे प्रायोजक म्हणून संपूर्ण सहकार्य केले.