corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज २७३ नवीन कोरोना रुग्ण(273 new corona patients) आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३६ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५०५३३  झाली असून जिल्ह्यात १४२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २७३ नवीन रुग्ण सापडले असून ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २१६ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १८४ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २ तर ग्रामीण मध्ये ३ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३२ , पेण १६ , खालापूर १०, अलिबाग ८,  कर्जत ६ , रोहा ६ , महाड ५ , श्रीवर्धन २  मुरुड  , म्हसळा , उरण  आणि माणगावमध्ये प्रत्येकी एक  रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात १,७८, ८३३  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ५०,५३३ पॉझिटिव्ह आल्या आहेत. २०९ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४५९७९ जणांनी मात केली असून ३१२७ रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात १४२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.