श्रीवर्धन तालुक्यात आढळले ३ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण, कुटुंबासह मुंबई येथून आले

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली या गावामध्ये १७ मे रोजी खार मुंबई येथून आलेल्या ५५ वर्षीय इसमाचा तसेच खुजारे या गावामध्ये प्रभादेवी मुंबई येथून आलेल्या ६२ वर्षीय अशा २ व्यक्तींचा संशयास्पद आकस्मित

 श्रीवर्धन तालुक्यातील वडवली या गावामध्ये १७ मे रोजी खार मुंबई येथून आलेल्या ५५ वर्षीय इसमाचा तसेच खुजारे या गावामध्ये प्रभादेवी मुंबई येथून आलेल्या ६२ वर्षीय अशा २ व्यक्तींचा संशयास्पद आकस्मित मृत्यु झाला होता तसेच दिघी येथील २३ वर्षीय तरुणीला कोरोनाची लक्षणे आढल्याने तिघांचे स्वॅब चाचणी करण्यात आली होती. आज शुक्रवार सकाळी तिनही रुग्णांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले व तिनही रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह निघाल्याने श्रीवर्धन तालुक्यात भितीचे वातावरण पसरले असून दिघी , खुजारे व वडवली गावांच्या सीमा प्रशासनाने पुर्णपणे सिल केल्या असून दिघी येथील पॉझीटीव्ह रुग्ण व त्यांच्या च्या जवळील  संपर्कातील ४ तर वडवली येथील मृत व्यक्तीच्या संपर्कातील ९ जणांना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. खुजारे गावातील मृत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना देखील हॉस्पीटल मध्ये पाठविण्याची प्रक्रीया सुरु होती. या तिनही गावांची मुख्य बाजारपेठ असणारी बोर्ली पंचतन बाजारपेठ खबरदारी म्हणून तातडीने पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

श्रीवर्धन तालुक्यात मागील महिन्या मध्ये भोस्ते गावातील ५ व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर त्यांचेवर उपचार झाल्यनांनंतर ते सर्व रुग्ण निगेटीव्ह झाले होते व त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांनंतर श्रीवर्धन तालुका काल पर्यंत एकही कोरोना रुग्ण नव्हता. सध्या मुंबई येथून आपल्या मुळ गावी येणाऱ्यांची संख्या खुप आहे. यातच बोर्ली पंचतन गावापासून ४ किमी अंतरावर असणाऱ्या वडवली गावामध्ये १७ मे रोजी खार-मुंबई येथून ५५ वर्षीय  इसम आपल्या कुटुंबासहीत आले होते त्या व्यक्तीचे लगेचच १८ मे रोजी आकस्मित सायंकाळी निधन झाले होते त्यामुळे या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यु वाटल्याने प्रशासनाने या मृत व्यक्तीचा कोरोना कोव्हीड १९ साठी स्वॅब घेतला होता त्याचप्रमाणे वडाळा मुंबई येथून दिघी गावामध्ये २३ वर्षीय तरूणी आपल्या आई-वडील, व दोन अन्य भावंडा समवेत १५ मे रोजी  आली होती या तरूणीला काही १८ मे रोजी ताप, खोकला झाल्याने तिला श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले व तिथे तिचा स्वॅब घेण्यात आला.

तर खुजारे या गावमध्ये प्रभादेवी मुंबई येथे या भागातून ६२ वर्षीय इसम आपल्या मुली व तसेच अन्य एका शेजारील गावातील दोघे नातलग असे आले होते परंतू  त्या ६२ वर्षीय इसमाचे १९ मे रोजी खुजारे येथे निधन झाले त्यांचे देखील खबरदारी म्हणून स्वॅब नमुने घेण्यात आले होते सदरचे तिनही अहवाल आज सकाळी लवकर श्रीवर्धन प्रशासनाकडे प्राप्त झाले व तिन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.  श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी यांच्या सुचनेवरून श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी , मंडळ अधिकारी सुनिल मोरे, बोर्ली पंचतन वैद्यकिय अधिकारी डॉ सुरज तडवी, दिघी सागरी पोलीस ठाणे सपोनि महेंद्र शेलार, तलाठी सुनिल भगत, मिलींद पुठ्ठेवार यांनी आपल्या सर्व टिम सह वडवली, खुजारे व दिघी गावास भेट दिली. 

तिनही गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून गावाच्या सीमा पुर्णपणे बंद केल्या यामध्ये कोणाही व्यक्तीला आत किंवा बाहेर जाता येणार नाही. दिघी येथील कोरोना बाधित २३ वर्षीय तरुणीसोबत आई-वडील, दोन भाऊ अशा एकूण 5 जणांना वडवली येथील मृत व्यक्तीच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबातील ९ जणांना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. खुजारे येथील ६२ वर्षीय मृत व्यक्तीच्या संपर्कातील      व्यक्तींना         येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. श्रीवर्धन तालुक्याची कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आता ८ झाली असून यातील ५ जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहेत तर २ व्यक्तींचा अहवाल येण्याआधीच घरी झाला आहे.मृत्यु