Corona Virus Image

रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ३०८ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४८३४६ झाली असून जिल्ह्यात १३४३  जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल: रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ३०८ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४८३४६ झाली असून जिल्ह्यात १३४३  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे ३०८ नवीन रुग्ण सापडले असून ३६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १९९ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १७३ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५ , कर्जत ३ ,पनवेल ग्रामीण व मानगाव मध्ये प्रत्येकी २ तर खालापूर , पेण आणि महाडमध्ये   प्रत्येकी २ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये २६, अलिबाग २२, माणगाव १६, खालापूर १२, मुरुड १०, कर्जत १०, पेण ८ ,उरण ७ , महाड ७ , रोहा ६, तळा ४ , श्रीवर्धन ३ , सुधागड २, म्हसळा  आणि पोलादापूरमध्ये एक रुग्ण आढळला  आहे.  रायगड जिल्ह्यात १,६७,९०० टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४८,३४६ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २९३  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४३०६८ जणांनी मात केली असून ३९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात १३४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.