Corona Virus

रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ४०७ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून २५  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५३१  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४७२०९  झाली असून जिल्ह्यात १२९१ जणांचा मृत्यू झाला आहे.  

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ४०७ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून २५  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५३१  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४७२०९  झाली असून जिल्ह्यात १२९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ४०७ नवीन रुग्ण सापडले असून ५३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २९३ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २३४ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात व ग्रामीणमध्ये प्रत्येकी ६ , खालापूर ५ , उरण २ तर कर्जत , पेण , अलिबाग , रोहा , श्रीवर्धन आणि पोलादापूर  येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ५९ , अलिबाग ३१ , रोहा १८ , पेण  १४ , उरण १२ ,खालापूर १०, कर्जत १० , माणगाव ६,  महाड ५ , मुरुड , सुधागड, श्रीवर्धन आणि म्हसळामध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यात १६४०६३  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४७२०९ पॉझिटिव्ह आल्या आहेत.तर १९८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४१९०७ जणांनी मात केली असून ४०११  रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १२९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.