corona virus

रायगड जिल्ह्यात आज ४०७४ नवीन कोरोना रुग्ण आढळले  असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५१३  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४६२८३ झाली असून जिल्ह्यात १२४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ४०७ नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५१३  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४६२८३ झाली असून जिल्ह्यात १२४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ४०७  नवीन रुग्ण सापडले असून ५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल तालुक्यात २७४  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २०८ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २, रोहा ३, उरण २, पनवेल ग्रामीण, महाड, तळा , माणगाव , अलिबाग आणि कर्जत येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ६६ , अलिबाग ४४, पेण १९ , कर्जत १४, रोहा १४, पोलादापूर ११, माणगाव  ८,  सुधागड ६, महाड ५, खालापूर ५,  मुरुड ४ , श्रीवर्धन २  आणि तळा तालुक्यामध्ये एक  रुग्ण आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात १६२१६२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  ४६२८३ पॉझिटिव्ह आल्या आहेत.तसेच १९८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४०७९८ जणांनी मात केली असून ४२४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १२४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.