Corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ४२६ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४१९५८  झाली असून जिल्ह्यात १११६  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ४२६ नवीन रुग्ण सापडले असून ६५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २९२  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल अलिबाग ३, खालापूर, कर्जत, रोहा प्रत्येकी २, पनवेल महापालिका, पनवेल ग्रामीण आणि महाड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ६३, अलिबाग ३४, पेण १९,  रोहा १६, महाड १४, कर्जत १२, खालापूर १२ , उरण ९ , माणगाव ६  मुरुड ५ , सुधागड ५ आणि श्रीवर्धन मध्ये २  रुग्ण  आढळले  आहे.  रायगड जिल्ह्यात १४५३४५ टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४१९५८ पॉझिटिव्ह आल्या आहेत ३३४  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर ३५२६७   जणांनी मात केली असून ५५७५  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १११६  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.