maharashtra corona cases

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवार ९ ऑगस्ट रोजी ४२७   नवीन रुग्ण  आढळले  असून १४  जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०४  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत.रायगड जिल्ह्यात  कोरोंनाच्या रुग्णांची  एकूण संख्या १८५६४  झाली असून जिल्ह्यात ५०४  जणांचा मृत्यू झाला आहे.                

रायगड जिल्ह्यात रविवारी  कोरोनाचे ४२७   नवीन रुग्ण सापडले असून ३०४  जणांनी कोरोंनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २४७    नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात २०६   नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८ , उरण  २ पेण २,  खालापूर आणि महाड  येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .    

पनवेल ग्रामीण मध्ये  ४१  ,अलिबाग ५४ ,  पेण ३०  , खालापूर २४  , रोहा १६ ,माणगाव १५ , उरण १४  , महाड ११  कर्जत ५ , श्रीवर्धन ५ ,  मुरुड ३  , सुधागड २  आणि पोलादापूर  मध्ये एक  रुग्ण  आढळला   आहे.  रायगड जिल्ह्यात  ६१३०९   टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १८५६४   पॉझिटिव्ह आल्या आहेत १७८    टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर १४६८१   जणांनी मात केली असून ३३७९  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ५०४  जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.