corona virus

पनवेल: रायगड जिल्ह्यात(raigad district) २१० नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४३७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४८५५६  झाली असून जिल्ह्यात १३७३  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे २१०  नवीन रुग्ण सापडले असून ४३७  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १५४ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १२१ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २० , अलिबाग ४ , पनवेल ग्रामीण , कर्जत , पेण , उरण आणि माणगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३३ , अलिबाग १७, पेण १४ , खालापूर ९ ,रोहा ५,  मुरुड ५ , उरण ३, कर्जत, माणगाव आणि श्रीवर्धनमध्ये एक रुग्ण आढळला आहे. रायगड जिल्ह्यात १६९२८०  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४८५५६  पॉझिटिव्ह आल्या आहेत.२६५  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४३५०५ जणांनी मात केली असून ३६७८  रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १३७३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.