Corona Image

पनवेल: रायगड जिल्ह्यात(raigad district) आज नवीन कोरोना ५१९ रुग्ण आढळले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५८४ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४६८०२  झाली असून जिल्ह्यात १२६६  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ५१९ नवीन रुग्ण सापडले असून ५८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ३२८ नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात २५६  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ८, कर्जत ४ , महाड व रोहा ३, अलिबाग २ आणि पनवेल ग्रामीण येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये ७२, अलिबाग ५३ , माणगाव २४ , पेण २१, कर्जत १८, महाड १७ , उरण १५ , रोहा१४ , खालापूर १० , सुधागड ८, मुरुड ४, श्रीवर्धन आणि पोलादपूर मध्ये २ रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यात १६४०५७  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४६८०२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. १९८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४१३८१   जणांनी मात केली असून ४१५५  रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात १२६६  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.