महाड पोलादपूरमधील ‘त्या’ ५३ नागरिकांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह पण २८ दिवस राहणार क्वारंटाईन

पोलादपूर : जगभरात कोरोणाचा संसर्ग वाढत असताना काही दिवसांपूर्वी पोलादपूर येथे ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण पोलादपूर हादरून निघाले व दुसऱ्याच दिवशी ही ६३ वर्षीय महिला मृत पावली. या

पोलादपूर : जगभरात कोरोणाचा संसर्ग वाढत असताना काही दिवसांपूर्वी पोलादपूर येथे ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण पोलादपूर हादरून निघाले व दुसऱ्याच दिवशी ही ६३ वर्षीय महिला मृत पावली. या महिलेच्या पतीला व मुलाला देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या ६३ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या ५३ नागरिकांची दोन दिवसांपूर्वी पनवेल येथील पथकाने तपासणी करुन कोरोना संदर्भातील नमुने तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी या ५३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने महाड पोलादपूरमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 दोन दिवसांपूर्वी पोलादपूर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५३ जणांचे स्लॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते या मध्ये पोलादपूर येथील २६ जण  उर्वरित महाड येथील नागरिकांचे नमुने पनवेल येथील तपासणी पथकाकडून घेण्यात आले व याची तपासणी अहवाल दोन दिवसात येतील असे सांगण्यात आले त्यानुसार शुक्रवारी या ५३ नागरिकांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे महाड पोलादपूरमधील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच या ५३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असले तरी हे ५३ जण २८ दिवस क्वारंटाईन राहणार आहेत. त्यामुळे या २८ दिवसात त्यांच्यामध्ये आजारपणाची कोणतीही लक्षणे आढळली नाही तर नक्कीच महाड पोलादपूरकर कोरोनापासून सुटकेचा निश्वास घेतील. तसेच नागरिकांनी अजून सुद्धा सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे बेजबाबदार वर्तन करू नये नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे.