corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ५५४ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६३७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४१५३२ झाली असून जिल्ह्यात ११०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ५५४ नवीन रुग्ण सापडले असून ६३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २५८  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २१२ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १, रोहा ३, कर्जत २,अलिबाग २, सुधागड आणि तळा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये ४६ , अलिबाग ६९, पेण ४३ , रोहा ३६ , खालापूर ३६, माणगाव २९, कर्जत २५, उरण २३ , महाड १४ , म्हसळा ७, पोलादपूर ७, मुरुड ३, सुधागड  आणि श्रीवर्धनमध्ये २ रुग्ण आढळले  आहे. रायगड जिल्ह्यात १४३६८७  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४१५३२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २८८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ३४६१७  जणांनी मात केली असून ५८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात ११०४  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.