Corona Virus

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ६१३ नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४३०७९  झाली असून जिल्ह्यात ११५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ६१३ नवीन रुग्ण सापडले असून ७४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ३२६ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २७३ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात १०, पेण, रोहा,  माणगाव , कर्जतमध्ये प्रत्येकी ३, खालापूर २, महाड  आणि पोलादापूर येथील एका . व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ५३ , अलिबाग ६८ ,पेण  ५८ , रोहा ३२ , माणगाव २९ , मुरुड २० ,उरण १९ , खालापूर १९ , महाड १८ , कर्जत १७ , श्रीवर्धन २ , पोलादापूर२ , सुधागड, , तळा आणि म्हसळ्यामध्ये एक  रुग्ण आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात १४९२८९  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४३०७९ पॉझिटिव्ह आल्या आहेत.तसेच २९३ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ३६६९३ जणांनी मात केली असून ५२२७  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ११५९  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.