Covid virus

पनवेल: रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ६४६ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५९ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३८४१९  झाली असून जिल्ह्यात १०३७  जणांचा मृत्यू झाला  आहे.

रायगड जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण सापडले असून ६५९  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २८३ नवीन रुग्ण आढळले  असून पनवेल महापालिका क्षेत्रात २१५ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५ अलिबाग ४ , खालापूर , कर्जत , पेण , तळा , महाड आणि पोलादपूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये , अलिबाग ८१, माणगाव ५३, रोहा ४७, पेण ४४, कर्जत ३१, खालापूर २८, महाड १८ ,उरण १४ , मुरुड १३, सुधागड १२ ,पोलादापूर १२ , म्हसळा ४ , तळा ४  आणि श्रीवर्धनमध्ये २ रुग्ण आढळले  आहे.  रायगड जिल्ह्यात  १३२८१२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३८४१९ पॉझिटिव्ह आल्या आहेत.तसेच २९७  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ३०८१८ जणांनी मात केली असून ६५६४  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १०३७  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.