रायगड जिल्ह्यामध्ये ६४८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ६४८ नवीन कोरोना(corona) रुग्ण आढळले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३७,७७३  झाली असून जिल्ह्यात १०२२  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ६४८ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून ६०० जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २८४ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २०९  नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज अलिबाग ५ , पनवेल महापालिका क्षेत्रात ३, कर्जत ३ , रोहा २ , माणगाव , खालापूर आणि पेण   येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ७५ , अलिबाग ७७, रोहा ७१, माणगाव ६१, पेण ५८, खालापूर ३५ , कर्जत २७, महाड १८, उरण ६ , सुधागड ४, श्रीवर्धन ४,पोलादापूर २ आणि तळ्यामध्ये एक रुग्ण आढळला  आहे. रायगड जिल्ह्यात १२९२०१  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  ३७७७३ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २४२ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ३०१५९ जणांनी मात केली असून ६५९२  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १०२२  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.