कोरोनाचा वाढता कहर
कोरोनाचा वाढता कहर

सुधागड(sudhagad) तालुक्यात बुधवारी (दि.२६) ७ कोरोना पॉझिटिव्ह(corana positive) रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाचे १५० रुग्ण झाले असून आत्तापर्यत कोरोनाचे १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पाली : सुधागड(sudhagad) तालुक्यात बुधवारी (दि.२६) ७ कोरोना पॉझिटिव्ह(corana positive) रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाचे १५० रुग्ण झाले असून आत्तापर्यत कोरोनाचे १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४३ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत अशी माहिती सुधागड-पाली (sudhagad-pali) तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली आहे. प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य आणि नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी केले आहे.