Corona Virus

पनवेल : रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ५२८ नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले  असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७०५  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ४३६०६  झाली असून जिल्ह्यात ११८२  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ५२८ नवीन रुग्ण सापडले असून ७०५  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ३२८ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २६४ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ५ , पनवेल ग्रामीण ६ ,अलिबाग ३ , खालापूर , कर्जत व महाडमध्ये प्रत्येकी २ तर पेण , श्रीवर्धन आणि पोलादापूर  येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ६४ , अलिबाग ४७ , पेण ३४ , माणगाव २१ , कर्जत २०, खालापूर १८ ,उरण १६ , महाड १५ , रोहा १०, श्रीवर्धन ८, पोलादपूर ६, सुधागड ३ , म्हसळा आणि  मुरुड मध्ये एक  रुग्ण आढळला आहे.  रायगड जिल्ह्यात  १५१३३९  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४३६०६ पॉझिटिव्ह आल्या आहेत २७८ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ३७३९८ जणांनी मात केली असून ५०२६  रुग्णावर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ११८२  जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.