रायगड जिल्ह्यात ८९३ नवीन कोरोना रुग्ण, १४ जणांचा मृत्यू

पनवेल: रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ८९३ नवीन कोरोना रुग्ण(corona patients) आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ३६३४३  झाली असून जिल्ह्यात ९७४  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे ८९३  नवीन कोरोना रुग्ण सापडले असून ६५१  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात ४२९  नवीन कोरोना रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २९१ नवीन रुग्ण आढळले  आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ६ , पनवेल ग्रामीण २, कर्जत २ ,रोहा २, खालापूर आणि अलिबाग येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण मध्ये १३८, अलिबाग ९३, रोहा ८७ पेण ७९ , माणगाव ७८ , खालापूर ४२  ,उरण २८  , कर्जत २३ , महाड १३ , पोलादापूर ७ , म्हसळा ५, तळा ५, सुधागड  आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहे. रायगड जिल्ह्यात १,२५,५७४  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३६, ३४३ पॉझिटिव्ह आल्या आहेत २८८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर २८,९१०   जणांनी मात केली असून ६,४४५  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ९८८ जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.