panvel corporation

पनवेल  : पनवेल महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या ९४५ कोटीच्या अर्थसंकल्पाला १३ ऑक्टोबरच्या  स्थायी समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली आहे .(panvel municipal corporation budget sanction) यामध्ये महापालिका उद्याने विकास , वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे बांधकाम व दुरूस्तीसाठी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन पनवेलकरांचा डासांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे .

पनवेल  : पनवेल महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या ९४५ कोटीच्या अर्थसंकल्पाला १३ ऑक्टोबरच्या  स्थायी समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली आहे .(panvel municipal corporation budget sanction) यामध्ये महापालिका उद्याने विकास , वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे बांधकाम व दुरूस्तीसाठी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन पनवेलकरांचा डासांचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.

पनवेल महापालिकेची स्थायी समितीची आर्थिक वर्ष सन २०१९-२० आणि २०२०-२१ चे मुळ वार्षिक अंदाज पत्रकाला मंजूरी देण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी ११.३० वाजता घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रवीण पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर , विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी सुचवलेल्या मूळ ९०६ कोटीच्या तरतुदीत सदस्यांनी दुरूस्ती सुचवल्याने ९४५ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

यामध्ये सदस्यांनी जमा बाजूला मालमत्ता व इतर करात १० कोटी , करेतर महसूल – शास्ति व शुल्कात ११कोटी , १% मुद्रांक शुल्क ९ कोटी , विकास शुल्क व फायर प्रीमियम ५ कोटी आणि जीएसटी अनुदान यामध्ये ५ कोटी अशी वाढ सुचवल्याने व शासनाकडून मिळणारे कोव्हिड -१९ अनुदान १५ कोटी असे ९४५ कोटी रुपये जमा होणार आहेत. तर इतर जमामध्ये १६ कोटीची घट सुचवण्यात आली आहे.

पनवेल महानगर पालिका हद्दीतील स्लॅब ड्रेन बांधकाम , स्टोर्म वॉटर ड्रेन नवीन गटार बांधकाम व दुरूस्तीसाठी अर्थसंकल्पात आयुक्तांनी १ कोटी रुपयांची तरतूद सुचवली होती सदस्यांनी ती २२ कोटीची केल्याने पनवेल शहर स्वच्छ राहून पनवेलकरांना डासांचा त्रास कमी होणार आहे. याशिवाय वैद्यकीय सेवा , रुग्णालये ७.५५कोटी , उद्यान विकासासाठी ५ कोटी , झोपडपट्टी वसाहतीत नागरी सुविधा पुरवण्यासाठी ३ कोटी , क्रीडांगणे २ कोटी , प्राथमिक शाळा इमारत दुरूस्ती ३ कोटी आणि आकस्मित कारणासाठी ९.८५ कोटीची वाढ सुचवण्यात आली. तर अभिकारत्या मार्फत कचरा वाहतूक व मनुष्यबळ पुरवठा यासाठी १० कोटी व इयत्र बाबींसाठी ४.४ कोटी घट सुचवण्यात येऊन ९४५ कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केला आहे.