इंदापूर रेल्वे स्टेशन समोर झाडाला धडकल्याने गॅस टँकरला आग

सुतारवाडी - इंदापूर मार्गे महाडच्या दिशेने गॅसने भरलेला टँकर चालला होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव गॅस टँकरची झाडाला धडक होउन अपघात झाला. जोरात धडक झाल्याने टँकरने लगेचच

 सुतारवाडी – इंदापूर मार्गे महाडच्या दिशेने गॅसने भरलेला टँकर चालला होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव गॅस टँकरची झाडाला धडक होउन अपघात झाला. जोरात धडक झाल्याने टँकरने लगेचच पेट घेतला. परंतु चालकाच्या प्रसंगावधनामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.