‘बाटू’मधील फी वाढीविरोधातील अभाविपच्या आंदोलनाला यश

महाड: लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या(batu) फी(fees) आकारणी विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने(abvp)[blurb content सोशल मिडियावर सुरु केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. विद्यापीठाने या आंदोलनाची दखल घेत विविध कारणांसाठी आकारण्यात येणारे ११ हजार ३१० रुपयांचे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील अभाविपने वाढलेल्या फी विरोधात सोशल मीडियावर आंदोलन केले. ट्विटरवर #Students_Against_DBATU हा HASHTAG trending ला आणून विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट २०२० ला डिजिटल आंदोलन केले.
लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी घरी असताना विद्यार्थ्यांकडून जिम,प्रयोगशाळा व इतर फीस घेण्याचे कॉलेजने ठरवले व शुल्क भरण्यासाठी सांगितले. परंतु अभाविपने याला विरोध केला व प्रशासनाला याच्या विरोधात झुकावे लागले.
जिम- ६०० रुपये, ट्रेनिंग व प्लेसमेंट- ४०० रुपये, ग्रंथालय- ३२५० रुपये, संगणक- २३५० रुपये, युवा कार्यक्रम- ६०० रुपये, प्रयोगशाळा ४००० रुपये, दवाखाना फी- ६० रुपये, खेळ- ५० रुपये अशी ११ हजार ३०० रुपये कमी केले आहेत.
त्याच प्रमाणे शैक्षणिक शुल्क हे ४ टप्प्यात भरण्याची विद्यार्थ्यांना मुभा द्यावी अशी ही मागणी करण्यात आली होती . विद्यापीठाने ती मागणी मान्य करून ४ टप्प्यात शुल्क भरण्याची तारीख खालीलप्रमाणे दिली आहे.
विषम सत्र टप्पा १ फीस भरण्याची शेवटची तारीख -३१ ऑक्टोबर २०२०
विषम सत्र टप्पा २ फीस भरण्याची शेवटची तारीख-३१ डिसेंबर २०२०
सम सत्र टप्पा १ फीस भरण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२१
सम सत्र टप्पा २ फीस भरण्याची शेवटची तारीख -३१ मार्च २०२१

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठाच्या कुलगुरूनी घेतलेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. हे आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यापीठ अध्यक्ष ऋतुराज लांब,  सागर कांबळे, प्रतीक मुरूमकर,आशिष कांबळे,ओंकार वाळके,सौरभ मोगल,सौरभ सारूक,वैभव जाधव,रुद्र पत्रावळे, शुभम अप्पा धरणे, यज्ञेश सानप यांनी यशस्वी केले.