मुंबई – गोवा महामार्गावर वाकणजवळ अपघात, नागोठण्यातील तरुण जागीच ठार

मुंबई - गोवा महामार्गावर आज वाकणजवळ अपघात(Accident Near Wakan) झाला. या अपघातात नागोठण्यातील(Man From Nagothane Died In Accident) तरुण राउफ चिपळूणकर जागीच ठार झाला.

    मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर(Mumbai -Goa National Highway) अपघातांची मालिका सुरूच आहे. मुंबई – गोवा महामार्गावर आज वाकणजवळ अपघात(Accident Near Wakan) झाला. या अपघातात नागोठण्यातील(Man From Nagothane Died In Accident) तरुण राउफ चिपळूणकर जागीच ठार झाला.

    नागोठण्या जवळून वाकणकडे मोटरसायकलवरून जात असताना वाकण पेट्रोल पंपासमोर ट्रकने ठोकर दिल्याने अपघात झाला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल दोन तास महामार्ग रोखल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन तासांनी मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.