letter regarding fishing raigad

पनवेल : कोकण किनारपट्टीवर अनधिकृतपणे परप्रांतीय मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर करून चालू असलेल्या मच्छिमारीला आळा घालण्यासाठी अशा बोटीवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया सिफेरर्स ॲन्ड जनरल वर्कर्स युनियनच्या पदाधिकार्‍यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख(aslam sheikh) व पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे(sanjay bansode) यांच्याकडे केली असता एलईडी दिव्यांचा वापर करणार्‍या परप्रांतीयांवर कारवाईचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले .

कोकण किनारपट्टीवर समुद्र किनारपट्टीपासून १२ नॉटिकल प्रदेश स्थानिक मच्छिमारांसाठी(fisherman) राखीव असताना अनधिकृतपणे परप्रांतीय मच्छीमारांकडून एलईडी दिव्यांचा वापर करून सुरू असलेल्या मच्छिमारीमुळे माशांचे साठे नष्ट होत आहेत. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमार बेरोजगार झाले आहेत. यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या शिष्टमंडळाने सोमवार २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख व पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास अस्लम शेख यांनी अशा प्रकारच्या अनधिकृत एलईडी बोटीवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले. त्यावेळी या शिष्टमंडळामध्ये युनियनचे अध्यक्ष संजय पवार , कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , संघटक पराग मुंबरकर , महाराष्ट्र उपाध्यक्ष अफजल देवळेकर , नवी मुंबई कार्याध्यक्ष सुरेश चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.