पनवेल शहर पोलिसांनी पाडेघर गावातील दारूभट्टी केली उद्ध्वस्त

पनवेल: नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना पनवेल तालुक्यात अवैध धंद्यामध्ये वाढ झाल्याने अशा अनैतिक धंद्यावर

 पनवेल: नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी  कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना पनवेल तालुक्यात अवैध धंद्यामध्ये वाढ झाल्याने अशा अनैतिक धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नवी मुंबई आयुक्तालयातील  परिमंडळ – २ चे उपायुक्त उपायुक्त अशोक दुधे आणि सहा. आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली  कारवाई करून पनवेल शहर पोलिसांनी पाडेघर गावातील दारू भट्टी उध्वस्त करून ५ जणांना अटक केली आहे. 

पनवेल शहर पोलिसांना पाडेघर गावाच्या हद्दीत बेकायदेशीर दारू पाडत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.आज पहाटे ५.४५ वाजता सहा.पोलीस निरीक्षक राजपूत , उप निरीक्षक  विश्वासराव बाबर, पो.नाईक बिन्नर , पो.शिपाई आव्हाड , महिला शिपाई भाग्यश्री भोईर यांनी टी पॉइंट ते जे.एन.पी.टी कडे जाणार्‍या रोड लगत  पनवेल तालुक्यातील पाडेघर  गावाच्या हद्दीत  झोपडपट्टीवर छापा टाकला असता चुलीवर एका झोपडीत दारू पाडत असताना एक पुरुष आणि पाच महिला आढळून आल्या. यावेळी १४५०० रुपयांची १५ लीटर  दारू, ३ मोबाईल  जप्त करण्यात येऊन ५८१२५ रुपयांचे दारू बनवण्यासाठी लागणारे १६७५ लिटर रसायन नष्ट करण्यात आल . यावेळी  झोपडीत दारू पाडताना सापडलेले मदन गोवारी, प्रतिभा गोवारी , मनप्पा  मेघावत, कविता चव्हाण आणि ललिता चव्हाण यांना अटक करण्यात  येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.