खांदा काँलनीत अवैध्यरीत्या विदेशी दारुचे बाँक्स विक्री करताना दोघांवर कारवाई

पनवेल : पनवेलच्या खांदा काँलनीतील हिमालया वाईन शॉपच्या चालकाला अवैध्यरीत्या विदेशी दारुचे बाँक्स विक्री करिता वाहतुक करीत असताना गुन्हे शाखा कक्ष -2 च्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडून कारसह 11लाख

पनवेल : पनवेलच्या खांदा काँलनीतील हिमालया वाईन शॉपच्या चालकाला अवैध्यरीत्या विदेशी दारुचे बाँक्स विक्री करिता वाहतुक करीत असताना गुन्हे शाखा कक्ष -2 च्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडून कारसह 11लाख 85 हजाराचा माल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे 

नवी मुंबई पोलिस आयुक्त परिमंडळ 2 मधील गुन्हे शाखा कक्ष 2 सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद ढोले यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी  खांदा काँलनी, शिवाजी चौक  येथील हिमालय वाईन शाँपच्या समोरील रोड वर एक सफेद रंगाची इरटीका मोटर कार नंबर – MH-46/BQ-0201- मधून अवैध्यरीत्या विदेशी दारुचे बाँक्स विक्री करिता वाहतुक आणि विक्री करीत असताना १) जयेश शरद शेटे,वय ४७ वर्ष, राहणार सुशील गार्डन,५२ बंगला, पनवेल तसेच 2) हिमालया वाईन शॉप चे चालक श्री अशिष सुभाषचंद्र उभान. उर्फ गोल्डी,वय वर्ष ४४.रा. कल्पतरु सोसा,पनवेल  यांना  इरटीका कार किंमत रुपये 10,50,000/- व विविध कंपनीची विदेशी दारू किंमत रुपये 1,35,340/- असा एकुण- ११,८५,३४०/ रुपये किंमतीचा माल जप्त करून व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले 

खांदेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हे शाखा कक्ष 2 चे सपोनी शरद ढोले, संदीप गायकवाड,  पोहवा/१९९१महेश चव्हाण, पोना /२३३४ प्रफुल्ल मोरे आणि पथक यांनी शनिवारी ही  कारवाई केली