गणेशोत्सव काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई करणार : पंकज गिरी

प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी रायगड जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना बंधनकारक राहील त्यासोबतच खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी गणेशमूर्तीची ठरवून दिल्याप्रमाणेच असावी अन्यथा संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहील.

 महाड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरोधात कारवाई करण्याचे संकेत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या दालनात आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना केले आहे. यावेळी प्रभारी अधिकारी पंकज गिरी बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुभद्राबाई धोत्रे, माजी उपसरपंच श्रीराम दामले, ग्रामपंचायत सदस्य संतोष तार, चॅलेंज मित्रमंडळाचे सचिन बागडे, सागर गांधी, डीके ग्रुप मित्र मंडळाचे दीपक स्वाई, अतीत पवार,  विकास क्लब गणेशोत्सव मंडळ बिरवाडी ,शिवाजी चौक मित्रमंडळ बिरवाडी चे कौस्तुभ धारिया अनिकेत येरूणकर ,यांच्यासह बिरवाडी ब्राह्मणसभा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.       

 या प्रसंगी पुढे बोलताना प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी रायगड जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना बंधनकारक राहील त्यासोबतच खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही ठिकाणी गणेशमूर्तीची ठरवून दिल्याप्रमाणेच असावी अन्यथा संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहील. अशा सूचना देतानाच तहसीलदार व संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक यांची पूर्व परवानगी गणेश उत्सव मंडळांना बंधनकारक असेल अशा सूचना दिल्या.       

विसर्जन व श्रींची मिरवणूक या ठिकाणी गर्दी जमविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना संबंधित ग्रामपंचायतीने कराव्यात असे देखील प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी ग्रामपंचायतींना सूचित केले आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने यावर्षी आपला उत्सव कालावधी कमी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये जाहीर करून जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यार असल्याचे जाहीर केले आहे.