पनवेल तालुक्यातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले मदतीचे धनादेश

पनवेल: निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यात नुकसान झालेल्या नागरिकांची पालकमंत्री आदिती

 पनवेल:  निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यात नुकसान झालेल्या नागरिकांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज भेट घेऊन त्यांना सरकारी मदतीचे धनादेश दिले. पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते  आज पनवेल तालुक्यातील  निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या खैरवाडी गारमाळ येथील महादीबाई गोमा थोराड, पूर्णतः नुकसान रक्कम १ लाख ५६ हजार १००, पिंट्या मारुती थोराड पूर्ण नुकसान रक्कम रुपये १ लाख १३ हजार ५००, पोशा आंबो थोराड मध्यम नुकसान  रूपय ९५ हजार १००, अंबो नामा थोराड मध्यम नुकसान रक्कम रुपये ३९ हजार १०० असे एकूण ४ लाख ३ हजार ८०० रुपयांचे मदतीचे धनादेश देण्यात आले.  यावेळी पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार अमित सानप, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, विजय कुमार साळवे, प्र.गटविकास अधिकारी संजय भोये  उपस्थित होते.