रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान – पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

अलिबाग : जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा,खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यात काल बुधवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी

 अलिबाग : जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा,खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यात काल बुधवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात २९ एप्रिलला रायगड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. कोकणातील भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून घरांची पडझड झाली आहे. या सर्वांची नुकसान भरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.