पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली कळंबोली येथील कोविड सेंटरची पाहणी

पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कळंबोली येथील देवांशी इन या हॉटेलमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी केली. त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून एकंदरीत

 पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कळंबोली येथील देवांशी इन या हॉटेलमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी केली. त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना सूचना दिल्या . कळंबोली येथील देवांशी इन या हॉटेलमध्ये ८१ बेडची सोय असलेले कोविड सेंटर प्रशासनाच्यावतीने उभारण्यात आले आहे. मंगळवारी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या सेंटरची पाहाणी केली. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समोर रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे आणि  ऑक्सिजन पुरवठा असणाऱ्या रुग्णवाहिका हव्या आहेत अशी भूमिका मांडली.

 पालकमंत्र्यांनी नागरिकांचा आरोग्य सर्व्हे अधिक प्रमाणत व्हायला हवेत  असे सांगून  आगामी आठवड्यात दोन लाख लोकांचा सर्व्हे करण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार बाळाराम पाटील, पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, सुदाम पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त शहाजी शिंदे, शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू उपस्थित होते.