रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धनला दिली भेट – कोविड केअर सेंटरच्या कामाचा घेतला आढावा

श्रीवर्धन: संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी व धैर्याने सामना करण्यासाठी संपूर्ण राज्याने कंबर कसली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे नियमितपणे रायगड प्रशासनाशी

श्रीवर्धन: संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसला सामोरे जाण्यासाठी व धैर्याने सामना करण्यासाठी संपूर्ण राज्याने कंबर कसली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे नियमितपणे रायगड प्रशासनाशी तसेच रायगडच्या जनतेशी संपर्क ठेवून आहेत .श्रीवर्धनच्या आमदार तसेच रायगडच्या पालकमंत्री या नात्याने त्या वेळोवेळी श्रीवर्धनमध्ये येऊन कोरोना संदर्भात उपाययोजना करून घेत आहेत. तसेच जनतेची लॉकडाऊन काळात गैरसोय होऊ नये याची काळजी घेत आहेत. आजमितीला श्रीवर्धन तालुक्यात कोरोना बाधित एकही रुग्ण नसल्याने श्रीवर्धनवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट असली तरी मुंबईसह इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातुन आलेल्या मूळ रहिवाशी लोकाकांकडून किंवा इतर कारणांनी पुढील काळात कोरोनाचा शिरकाव श्रीवर्धनमध्ये झालाच तर त्यासाठी उपाययोजना म्हणून कोरोना केअर सेंटर उभारण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी या आधीच श्रीवर्धन प्रशासनाला दिल्या होत्या. त्यादृष्टीने त्यांनी आज श्रीवर्धनला भेट देऊन श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी .एन .पवार, तहसीलदार सचिन गोसावी, मेडिकल सुप्रिडेंट डॉ मधुकर ढवळे,पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, मुख्याधिकारी किरण मोरे, गटविकास अधिकारी भोगे तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांची सोशल डिस्टन्स पाळत बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत आढावा घेऊन शासकीय वर्गाला सूचना केल्या. बैठक संपल्यानंतर आदिती तटकरे यांनी उभारल्या जाणाऱ्या कोविड केअर सेंटर्सना प्रत्यक्ष जाऊन त्या त्या ठिकाणची पाहणी करून त्याठिकाणी डाॅक्टर्स व पोलिसांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, जेवणाची उत्तम सोय व्हावी याकरीता किचन असावे, त्याठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात यावे, तसेच रूग्णांच्या तपासणी करीता स्वतंत्र आरोग्य तपासणी कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.