प्रशासन अॅक्शन मोडमध्ये; तळियेनंतर ‘या’ 13 गावांना मोठा धोका

महाड तालुक्यातील 4 गावांना तळियेप्रमाणे दरड कोसळण्याचा धोका आहे. तर पोलाडपूर तालुक्यात देखील 9 गावात अशाच प्रकारची दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एका सर्वेक्षणातून या धोक्याची सुचना प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

    रायगड : 22 जुलैपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे कोकणात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. महाडच्या तळिये गावात दरड कोसळून तब्बल 94 जणांचा मृत्यु झाला होता. त्यामुऴे आजुबाजूच्या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातच आता अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासान आता सतर्क झाल्याचं दिसत आहे.

    दरम्यान महाड तालुक्यातील 4 गावांना तळियेप्रमाणे दरड कोसळण्याचा धोका आहे. तर पोलाडपूर तालुक्यात देखील 9 गावात अशाच प्रकारची दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एका सर्वेक्षणातून या धोक्याची सुचना प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजगड जिल्ह्यातील 13 गावांना दरड कोसळण्याचा धोका असल्यानं 143 कूटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

    कोणते गाव आहेत?

    हिरकणीवाडी, मोहोत सुतारवाडी, मोहोत भिसेवाडी आणि वाघेरी ही 4 महाड तालुक्यातील गावांचा यात समावेश आहे. तर साखर सुतारवाडी, साखर चव्हाणवाडी, साखर पेढेवाडी, केवनाळे, दाभीळ, चरई, माटवण, सवाद आणि कनगुले या 9 पोलाडपूर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. दरम्यान, या 13 गावांमधील 143 कूटुंबांच्या घरावर दरड कोसळण्याचा धोका आहे. त्या 143 कुटूंबामध्ये 1,555 लोकांचा समावेश आहे. भारतीय भूवैज्ञानिक विभागाच्या पुणे विभागाने हे सर्वेक्षण केलं असून त्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला देण्यात आला होता.