महाडमधील मागासवर्गीय मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

पनवेल : रायगड जिल्ह्यातील महाड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२० - २१ करीता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी फॉर्म भरुन आपल्या

पनवेल : रायगड जिल्ह्यातील महाड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करीता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी फॉर्म भरुन आपल्या पाल्याचे प्रवेश नोंदणी करण्याचे आवाहन गृहपाल सुधा सावंत यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण ‘रायगड – अलिबाग यांचेतर्फे महाड येथे चालविण्यात येणार्‍या  

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये  शैक्षणिक वर्ष २०२० – २१ करीता प्रवेश सुरू झाले असून या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी करण्यासाठी https://surveyheart.com/form/5eeafbfcfebe7059af16ef8e या लिंकवर जाऊन साधा सोपा सुटसुटीत फॉर्म भरा व आपल्या पाल्याचे प्रवेश नोंदणी करण्याचे आवाहन गृहपाल सुधा सावंत यांनी केले आहे . वसतिगृह सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वसतिगृहात जमा केल्यानंतरच उपलब्ध आरक्षणानुसार रिक्त जागांवर नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे . प्रवेशासाठी ९४२३०९२८२२ या क्रमांकावर संपर्क करावा.      
 प्रवेशासाठी आरक्षण :अनुसूचित जाती ( एससी) – ८०%
अनुसूचित जमाती (एसटी) – ३%
वि.जा.भ.ज (व्हिजेएनटी) –  ५%
विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) – २ %  आर्थिक मागास प्रवर्ग (ईबीसी)- ५ %  
अपंग – ३%
अनाथ -२%
  वसतिगृहात पुढील व इतर आवश्यक त्या सोयी, सुविधा विनामूल्य देण्यात येतात .
१) निवास व भोजन
 २) शैक्षणिक साहित्य भत्ता
 ३) निर्वाह भत्ता
 ४) संगणक व ग्रंथालय सुविधा
 ५) छत्री, रेनकोट, गमबूट भत्ता
 ६) प्रोजेक्ट व अॅप्रन भत्ता व इतर