poladpur strike

पोलादपूर :पोलादपूरात(poladpur) गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत वितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त असल्याने व  अधिकारी कर्मचारी कोणती कार्यवाही करत नसल्याने  माजी जिल्हा परिषद सदस्य  अनिल नलावडे हे गुरुवार रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार होते.  मात्र २७ व २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या चर्चेनंतर आणि पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या मध्यस्थीनंतर व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लेखी  आश्‍वासनानंतर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

पोलादपूर :पोलादपूरात(poladpur) गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत वितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त असल्याने व  अधिकारी कर्मचारी कोणती कार्यवाही करत नसल्याने  माजी जिल्हा परिषद सदस्य  अनिल नलावडे हे गुरुवार रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण(hunger strike) करणार होते.  मात्र २७ व २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या चर्चेनंतर आणि पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या मध्यस्थीनंतर व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून लेखी  आश्‍वासनानंतर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

पोलादपूरमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, व्होल्टेज कमी राहणे,वीज ग्राहकांना विद्युत बिले वापरपेक्षा जास्त येणे आदी अनेक कारणांमुळे पोलादपूर तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली असल्याने अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांना जाब विचारला तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत  असल्याने व  रिडींग घेणारे कर्मचारी प्रत्यक्ष रिडींग न घेता काहीतरी कारणे दाखवून अंदाजे रिडींग देत असल्याने  भरमसाठ बिलांचा बोजा ग्राहकांवर पडत होता.याबाबत वारंवार विचारणा व पत्रव्यवहार करून कोणतीही कार्यवाही होत नाही असा आरोप करत या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी २९ ऑक्टोबरला शांततेच्या मार्गाने  माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल नलावडे हे विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसणार होते . मात्र पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या मध्यस्थीनंतर आणि स्थानिक नागरिक यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान विद्युत मंडळाच्या वीज वितरण कंपनीचे उप अभियंता  सुद यांनी जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कामात मध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरात तांत्रिक बिघाड सुधारणा करून व  ए बी स्विच चा वापर करून शहरात वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी प्रयत्न करणार असून तसेच तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी ही प्रयत्न करणार असून आणि  रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केलेला आहे रिक्त पदे लवकरात लवकर  भरण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सुद म्हणाले.  उपोषणाच्या  सर्व मुद्द्यांबाबत गांभीर्याने विचार करून जनतेचे प्रश्न व होणारी गैरसोय टाळण्याचा ही  प्रयत्न केला जाईल असे  लेखी आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

या बैठकीवेळी प्रसन्ना पालांडे, सचिन शेठ, राजा दीक्षित, महेश दरेकर, बाळकृष्ण चव्हाण, जगन्नाथ वाडकर, नायब तहसीलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.