murud beach shop

मुरुड जंजिरा: लॉकडाऊनमुळे आणि निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. मात्र आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. कोकणातील काही ठिकाणी पर्यटक येऊ लागले आहेत.त्यामुळे पर्यटनस्थळांवर आधारित व्यवसाय सुरु झाले आहेत. निसर्गरम्य मुरुडला(murud) अनेक पर्यटक भेट(tourist visit) देत आहेत. त्यामुळे येथील किनाऱ्यावर व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुरुड समुद्रकिनारी(murud beach) सुमारे ४४ टपरीधारक असून या लोकांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र खचून न जाता या लोकांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्यासुद्धा बनवण्यात येऊन पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. चहा टपरी त्याचप्रमाणे अल्पोपहार व भोजन बनवून देणाऱ्या सर्व टपऱ्या संचारबंदीमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने या भागात रेलचेल सुरू झाली आहे.

काही प्रमाणात पर्यटक सुरू झाल्याने सध्या या टपऱ्यांवरील व्यसयाला सुरुवात झाली आहे. यात पावसाचा कधीकधी व्यत्यय येत असतो.पण अनेक टपरीधारकांनी सांगितले की, पाऊस कमी असेल तर पर्यटक जास्त प्रमाणात येतात. स्वच्छ सूर्य प्रकाश व ऐतिहासिक जंजिरा किल्ला सुरू झाल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल याचा फायदा समुद्र किनारी असणाऱ्या सर्व टपरी धारकांना होणार आहे. मात्र सध्या मुरुडमध्ये काही प्रमाणात पर्यटक सुरू झाले आहेत. त्यामुळेच टपरीधारकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. लवकरच जंजिरा किल्ला पर्यटकांना खुला झाल्यावर पर्यटक संख्या वाढेल, असे टपरीधारक सांगतात.