चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, सुधागड तालुका प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…

पाली : मुंबई,कोकण,रायगड,पालघर या सागरी किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार असल्याने सर्वांना सतर्क राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्कतेसाठी उपाययोजना म्हणून

पाली : मुंबई,कोकण,रायगड,पालघर या सागरी किनारपट्टीवर  चक्रीवादळ धडकणार असल्याने सर्वांना सतर्क राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्कतेसाठी उपाययोजना म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांसकडून  सर्व तालुका प्रशासनाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुधागड तालुका प्रशासन देखील येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाले आहे. सुधागड तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागडात खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार चक्रीवादळाच्या आपत्तीपासून सतर्कतेसाठी आदिवासी वाडीवरील झोपडीत व कच्च्या भिंतींच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्क्या घरात योग्य जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन असलेल्यांना समाजमंदिर अथवा त्यांच्या सुरक्षित जागी ठेवण्यात आले आहे.  प्रत्येक ग्रामपंचायत तसेच गावातील जवळपास वीस स्वयंसेवक,मजूर यांची एक टीम चक्रीवादळापासून काही अपघात घडल्यास तात्काळ मदतीसाठी तयार ठेवली आहे. 

सुधागडातील कंत्राटदारांच्या माध्यमातून जेसीबी,पोकलन,डंपर अशा यंत्रणेला सुधागडातील महागाव,नांदगाव,पाली,परळी तसेच दुर्गंम भागात काही घटना घडल्यास मदातीसाठी तयार ठेवले आहे. सुधागडातील सर्व तलाठी,ग्रामसेवक,सरपंच,कृषी विभाग ,मजूर कामगार तसेच ज्यांनी कोव्हिड मध्ये स्वयंसेवक म्हणून चांगलं काम केलं आहे त्यांना सुद्धा यासाठी मदतीसाठी सतर्क ठेवले आहे. 

पशु वैधकीय अधिकारी यांच्याकडून देखील पशुपालकांना पशूंना बाहेर न सोडता गोठ्यात,तसेच योग्य जागी त्यांची चारापाण्याची,खाद्याची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.चक्रीवादळापासून काही अपघात घडू नये यासाठी सुधागड तालुक्याच्या मुख्य बाजारपेठा बंद ठेऊन नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन सुधागड तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावर यांसकडून करण्यात आले आहे.