नागोठणे येथील रिलायन्स कंपनी विरोधात आंदोलन पेटले

लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्यावतीने रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कडसुरे मटेरियल गेट समोर शुक्रवारपासून प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिपुत्र व नलिकाग्रस्त यांच्या उत्स्फूर्त सहभागाने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी  संविधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत प्रदीर्घ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या  मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.दरम्यान प्रकल्पग्रस्तांकडून शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेला ठिय्या आंदोलन रविवारी तीसर्या दिवशीही सुरूच होते. 

  • जीव गेला तरी माघार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील : प्रकल्पग्रस्तांचा एल्गार
  • प्रकल्पग्रस्तांचा तीन दिवसांपासून कंपनी गेट समोर ठिय्या

अनिल पवार
नागोठणे (Nagothane). लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्यावतीने रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कडसुरे मटेरियल गेट समोर शुक्रवारपासून प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिपुत्र व नलिकाग्रस्त यांच्या उत्स्फूर्त सहभागाने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी  संविधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत प्रदीर्घ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या  मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.दरम्यान प्रकल्पग्रस्तांकडून शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेला ठिय्या आंदोलन रविवारी तीसर्या दिवशीही सुरूच होते.

 पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स यांनी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना १२८७ प्रमाणपत्र दिले होते. यापैकी ६०१ प्राधान्य प्रमाणपत्र धारक, ११० नलीकाग्रत व ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचां शिक्का आहे अशा सर्व शेतकरी यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून  त्यांना  आजवरचा  संपूर्ण पगार, तसेच  वार्षिक बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त यांनी एकजुटीने हा लढा उभारला असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

भारत सरकार , दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा.पी. बी . सावंत  संस्थापक लोकशासन आदोलन यांच्या मार्गदर्शनात व मुंबई  उच्च न्यायालायचे माजी न्यायमूर्ती मा . बी . जी . कोळसे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ३६ वर्षानंतर प्रथमच पचक्रोशी मौजे नागोठणे ते मौजे चोळे ३६ वर्षापासून प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त याच्यावर आजपर्यंत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात  १५ फुट उंचीच्या प्रतिकात्मक पुतळा स्थापित केला आहे.  जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही . आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर जमिनी परत करा, वेळ प्रसगी लाठी खाऊ , छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलू असा इशारा देत मे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.नागोठणे कारखान्यात कायम स्वरूपी कामावर रुजू करून घेतलेच पाहिजे . अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलीय.आमच्या मागण्या जोपर्यंत मजूर होत नाही , तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठासून सांगितले.  पंचक्रोशीतील सर्व प्राधान्य प्रमाणपत्र धारक नलिकाग्रस्त प्रमाणपत्र धारक , ज्याच्या ७/१२ उताऱ्यावर MIDCचा शिक्का आहे; परंतु प्रमाणपत्र नाही कंत्राटी कामगार , सेवा निवृत्त कामगार , सुशिक्षित बेरोजगार कायम स्वरूपी कामगार यांना कळविण्यात येते कि , ३६ वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या बाबत खालील मागण्यावर रिलायस इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे व्यवस्थापन व लोकशासन आदोलन संघर्ष समिती बरोबर खालील मागण्यावर निर्णायक चर्चा होणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या मध्यस्तीने पार पडलेल्या बैठकीत ठरले होते . मात्र उशिरापर्यंत कोणतीही बैठक न झाल्याने आंदोलन सुरूच राहिले, दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी भोजन बनविण्याची देखील तयारी केली होती.

लोकशासन संघर्ष समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड  यांच्या नेतृत्वात  सर्व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्तानी आबेघर – वेलशेत चौकात एकत्र जमत एकजुटीने रिलायन्स मटेरियल गेटवर धडक दिली. दरम्यान मुकेश अबानी यांच्या १५ फुट उंचीचा पुतळा उभा करण्यात आला आहे. रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त आता करो या मरोच्या भूमिकेत आहेत. आदी मागण्यांचा समावेश असून दरम्यान आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर जमिनी परत करा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी लावून धरली आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे. याचवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या : 
१) कामावर घेण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करून त्वरित देण्यात यावी.
विशेष भूसंपादन अधिकारी क्रमाक – परायगड अलिबाग यांनी उर्वरित ६०१ प्राधान्य प्रमाणपत्र धारक ११० नलिकाग्रस्त प्रमाणपत्र धारक व नव्याने समाविष्ट झालेले , ज्याच्या ७ / १२ उताऱ्यावर MIDC चा शिक्का आहे परंतु त्यांना प्रमाणपत्र मा . विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक -१ रायगड अलिबाग यांनी दिलेले नाही . अशा सर्व प्रकल्पग्रस्त व्यक्तींना मे रिलायन्स इंडस्ट्रीज लि , व्यवस्थापन नागोठणे येथिल कंपनीत कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेण्यासाठी अंतिम निश्चित तारीख त्वरित देण्यात यावी .
२ ) दर महिन्याचा पगार व वार्षिक बोनस व्याजासह दिलाच पाहिजे .
३) आमच्या शेतजमिनी आम्हाला परत द्या.
४ ) निवृत्तीचे वय मर्यादा ही वय वर्षे ५८ ऐवजी वय वर्षे ६० झालीच पाहिजे.
५) कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कायदा लाग झालाच पाहिजे.
६ ) किमान ८० % स्थानिक उमेदवारांना नोकऱ्या मध्ये प्राधान्याने घेतलेच पाहिजे.
७) निलंबित केलेल्या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेतलेच पाहिजे.