आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन दिवसांमध्ये परराज्यातील २२०० नागरिकांना वैद्यकीय दाखले

पनवेल: पनवेल ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठवड्यात नियमित रुग्ण तपासणी बरोबरच परराज्यातील नागरिकांनी आपल्या मूळ गावाला परत जाण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला घेण्यासाठी मोठी

पनवेल: पनवेल ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठवड्यात नियमित रुग्ण तपासणी बरोबरच परराज्यातील नागरिकांनी आपल्या मूळ गावाला  परत जाण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यातील आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन दिवसात २२००पेक्षा जास्त  परराज्यातील नागरिकांना मूळ गावाला  रत जाण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय दाखले देण्यात आल्याची माहिती डॉक्टर प्रभाकर पाटील यांनी दिली. 

कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे  परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी  प्रवास करण्यापूर्वी प्रत्येकाला सध्या जेथे राहत आहेत तेथील नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय /  किंवा नोंदणीकृत खाजगी दवाखान्यात डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करुन घेवून वैद्यकीय दाखला घेणे आणि  तो  प्रवासादरम्यान स्वत: सोबत बाळगणे  बंधनकारक केले आहे. खाजगी दवाखान्यात त्यासाठी फी आकारली जाते . प्राथमिक आरोग्य केंद्रात  तो मोफत मिळत असल्याने  डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करुन घेवून वैद्यकीय दाखला  घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.  पनवेलच्या ग्रामीण भागातील  आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून  ५ मे पर्यंत २ हजार २२ प्रमाणपत्र देण्यात आली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व जनता विद्यालय, आजीवली आणि अमेठी विद्यापीठ , भाताण या तीन ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली होती. आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे  डॉक्टर प्रभाकर पाटील , डॉक्टर विजया पवार , प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रणया म्हात्रे , डॉक्टर मृणाली चव्हाण , आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी , कनिष्ठ सहाय्यक, स्त्री परिचर, सफाई कामगार, वाहन चालक, सुरक्षा रक्षक,  माजी पंचायत समिति सदस्य ज्ञानेश्वर बडे , पोलिस पाटील जाधव , भाताण सरपंच सुभाष भोईर,उप सरपंच अनिल काठावळे , आशा स्वयंसेविका जयश्री मुकादम , भाताण ग्रामपंचायत कर्मचारी श्रीमती कल्याणी , पनवेल तहसील कार्यालयाचे अरूण जोशी , शैलेश गजभिये यांनी सहकार्य केले .