अलिबाग तालुक्यात आढळला आणखी १ कोरोनाबाधित

अलिबाग : तळवडे येथील मुंबई पोलीस कोरोनाबाधित आढळला असतानाच तालुक्यातीलच रामराज परिसरातील मोरोंडे गावातील आणखी एका तरुणाची टेस्ट कोरोनो पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अलिबाग

 अलिबाग : तळवडे येथील मुंबई पोलीस कोरोनाबाधित आढळला असतानाच तालुक्यातीलच रामराज परिसरातील मोरोंडे गावातील आणखी एका तरुणाची टेस्ट कोरोनो पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील रुग्ण संख्या २ झाली आहे. जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यात  आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. सर्वजण बिनधास्त असतानाच प्रशासनाचे धाबे दणाणून सोडत पहिला पॉझिटीव्ह रुग्ण सापडला. कार्लेखिंडजनीक असलेल्या तळवडे गावात सापडलेला हा रुग्ण ३९ वर्षांचा असून, मुंबई दलातील पोलीस कर्मचारी आहे. ही बातमी जिल्ह्यात वार्‍याच्या वेगाने पसरली आणि रायगडकर दहशतीच्या छायेत आले. ही बातमी पसरत असतानाच रामराज- मोरोंडे येथीलही आणखी एका तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची चर्चा तालुक्यात होत होती. मात्र याचा जराही थांगपत्ता प्रशासनाला नव्हता.

रामराम परिसरातील मोरोंडे गावातील २४ वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट  पॉझिटीव्ह आली आहे. रात्री उशिरा त्याचे रिपोर्ट हाती आले आहेत. खोपोली येथील एका कंपनीत कामाला असलेला हा तरुण काही दिवसांपूर्वीच मोरोंडे येथे आला होता. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्गातून कोरोनाची लागण झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. दरम्यान, या तरुणाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.